वत्सासुराचा आणि बकासुराचा वध

कृष्ण आणि इतर गुराखी वृंदावनाचा आनंद लुटत होते. ते पुष्कळ खेळ खेळत. त्यात त्यांच्या काही ना काही खोड्या चालूच असायच्या. काही गुराखी गोफणीतून नेम धरून दगड आणि गोट्या मारत. काहीजण अंगावर घोंगडी पांघरून गायी-बैलांसारखे चार पायांवर चालत; आणि एकमेकांच्या डोक्यांवर डोकी आपटून टक्कर घेत.  काहीजण मधमाशांसारखा आवाज करत फिरत. काहीजण कोकिळांबरोबर कुहुकुहु गात असत. काहीजण…